सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ सोबत (भुजंगप्रयात)… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
नको रे लपंडाव खेळू असा तू
नको भावनांना दुखावू असा तू
ढगाआड चंद्रासवे तारकांना
किती कष्ट होती तया शोधताना
किती घेतल्या आणभाका मिळोनी
अजूनी मनी ठेविल्या मी जपोनी
कुठे सर्व गेली तुझी प्रीतवचने
तुझ्यावीण माझे अधूरेच असणे
जळावीण मासा तडफडे जसा रे
विनासंग माझी तशी ही दशा रे
सदा मी जगावे तुझ्या सोबतीने
हसावे रडावे तुझ्या संगतीने
असू देत ध्यानी तुझी साउली मी
तुला साथ देणार दर पाउली मी
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈