सुश्री विभावरी कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ मधुमालती… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
फुललेली मधुमालती सुंदर दिसते
मंद सुगंध सगळीकडे पसरते
साधे पणाने मन प्रफुल्लित करते
पण तिला देवघरात स्थान नसते
कधी केसात वेणी बनून असते
कधी मुलांचे खेळणे बनते
कधी नुसतीच पायदळी जाते
कधी कचरा म्हणून हिणवली जाते
तरीही रोज रोज फुलते
आनंदाने बहरत जात असते
बघणाऱ्यांना आनंद देत असते
जणू आपल्याला संदेशच देत असते
कुणी कसेही वागले
कुठेही स्थान नसले
कोणी काळजी घेणारे नसले
तरीही आपण आपला धर्म सोडू नये
घेतला वसा टाकू नये
आनंद व सुगंध देणे थांबवू नये
© सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈