श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “किल्ला” ☆ श्री आशिष मुळे ☆

जमवून पोरांचा तो गलका

जणू अभेद्य किल्ला बांधावा

उभा करून माहोल दोस्तीचा

वाटते पुन्हा तो कल्ला करावा ।

 

खांद्यांवर त्या हात टाकून

मनावरचा भार हलका करावा

तिची अधुरी कहाणी सांगून

वाटते पुन्हा तो कल्ला करावा ।

 

बिल्डिंगच्या गच्चीत उमललेली

ती कौतुकाने पाहणारी सूर्यफूले

सुगंध त्यांचा अनुभवायला

वाटते पुन्हा तो कल्ला करावा ।

 

गॅलरीत उभ्या गरिबाच्या श्रीमंतीशी

संवाद भरल्या डोळ्यांनी करावा

करत निश्चय मोठं होण्याचा

वाटते पुन्हा तो कल्ला करावा ।

 

करून त्याग या सुन्या महालाचा

रात्रीचा तो कट्टा जागवावा

तुटलेल्या त्या पहारी घेऊन

पुन्हा एकदा किल्ला बांधावा ।

 

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments