श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ स्वर आले जुळूनी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
हसली राधा दिसला
मोहन
लपला जो लोचनी
अचानक स्वर आले जुळूनी
कुठे वाजता घुंघरवाळा
बाळकृष्ण तो दिसे सावळा
हात पसरीता घ्याया उचलूनी पडली आलिंगनी
रित्या घटांतून भरता पाणी
कुजबुजलेला वाटे कोणी
मोरपिसांचा स्पर्श भासतो जाई रोमांचुनी
कदंब हसला हसले गोकुळ
हसता यमुना झाली व्याकुळ
आभासाचे मृगजळ उठवी लाज तिच्या लोचनी
परनिंदेचे तुफान वादळ
मनी माजवी अनंत खळबळ
दचकून उठला हसला मोहन
लपला जो लोचनी
राधा म्हणजे अविधाभक्ती
म्हणोत कोणी तीज आसक्ती
कणा कणातून वास हरिचा घालतसे मोहिनी
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
[…] Source link […]