श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 201
☆ सोनचाफा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
भाळण्याचे हे तुझेही वय कुठे
शीळ मीही घालतो पण लय कुठे
सोनचाफा यायची तू माळुनी
विसर म्हणता विसरते ती सय कुठे
सोडुनी आलीस सारी बंधने
सांग तू केली कुणाची गय कुठे
अमृताचा लाव ओठी तू घडा
गार करते पाजुनी मज पय कुठे
तीच आहे आत अजुनी भावना
भावनेला सांग होतो क्षय कुठे
तोडल्या केव्हाच आपण शृंखला
राहिले आता जगाचे भय कुठे
वागलो तेव्हा जरी हटके जरा
सोडला आजून आपण नय कुठे
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈