सौ. मंजुषा सुधीर आफळे
कवितेचा उत्सव
☆ चंद्रयान – ३ ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆
खेळे चांदणे उन्हात
भान आज हरपले
चंद्रमाला भेटावया
भूलोकीचे स्वर्गी आले.
स्वप्न हळव्या अंतरी
पाहिले साराभाईंनी
सत्यात उतरवले
थोर त्या वैज्ञानिकांनी
अपार कष्ट झेलले
प्रज्ञा श्रेष्ठ प्रमाणिले
अधिष्ठान श्रीशंभूचे
यत्ने ध्येय प्रकाशले.
धन्य ते भारतवासी
दक्षिण ध्रुवी पातले
प्रथम चंद्रयान-३ ने
ध्वज अति उंच नेले.
पावन ही चंद्रभूमी
तिरंगा तो फडकला.
भारतीय सुपुत्रांचा
गर्व उरात दाटला.
बुद्धीदायी, कीर्तीदायी
जय जय हे भारती
निष्ठा कधी ना ढळू दे.
प्रेरक ही देशभक्ती.
ओजस रूपात तुझ्या
सदैव लीन असावे
भारत भूवरी आम्ही
पुन्हा पुन्हा जन्मा यावे.
जय हिंद
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈