श्री सुनील देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “कैसे द्यावे उत्तर…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
जबाबदारी नको कोणती
हक्कासाठी मारू पत्थर
झुंडशाहीला लोकशाहीने
सांगा कैसे द्यावे उत्तर
मला हवे ते मला मिळावे
मी म्हणतो ते एकच उत्तर
ठोकशाहीला लोकशाहीने
सांगा कैसे द्यावे उत्तर
मोडू तोडू सदा कायदा
नशेत बरळू आम्ही निरंतर
झोकशाहीला लोकशाहीने
सांगा कैसे द्यावे उत्तर
सीमेवरती शत्रू ठाकला
सडेतोड ते देऊ उत्तर
अराजकाला लोकशाहीने
सांगा कैसे द्यावे उत्तर
© श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈