सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ विश्वविक्रम… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

उंचावत भारताची शान

पोचले चंद्रावरती यान ||ध्रु||

 

वेध मनी नित खगोलाचे

ग्रहताऱ्यांना अभ्यासण्याचे

संशोधकांची जिद्द महान

पोचले चंद्रावरती यान ||१||

 

विज्ञानाची कास धरूनिया

समन्वयाचे तंत्र जपुनिया

साधले अचूक ते संधान

पोचले चंद्रावरती यान ||२||

 

ठसा उमटवला देशाचा

अथक साधना संकल्पांचा

यश जाहले प्रकाशमान

पोचले चंद्रावरती यान ||३||

 

अवकाशी कितीतरी गुपिते

अज्ञाताला शोधत फिरते

होतसे संशोधन आसान

पोचले चंद्रावरती यान ||४||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments