☆ कवितेचा उत्सव ☆ मन ☆ श्रीशैल चौगुले ☆
मन समुद्राची लाट
मन क्षितीज ललाट.
मनात नाचे सृष्टी
मन हवा ही पिसाट.
मन वेडी हिरवाई
मन पर्वताचा घाट.
मन गगन निरभ्र
मन मेघ घनदाट.
मन सूर्य नि चंद्र
मन धरतीचा थाट.
मन हृदयाचे भाव
मन प्रेमबंध गाठ.
मन सुख-दुःख क्षण
मन जीवन अवीट.
मन मंदिराचे दार
मन कैवल्याचा काठ.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈