कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 194 – विजय साहित्य ?

पुर्णान्न भाकर…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

आग पोटाची शमवी

अशी पुर्णान्न भाकर

शाळू,नाचणी,तांदूळ

पोट भरीतो चाकर…! १

 

हातावर पोट ज्यांचे

भाजी भाकरी मिळावी

शिळी किंवा ताजी असो

सुख शांती मेळवावी…! २

 

भुक अन्नाची भागते

कोरभर भाकरीत

राबे अहोरात्र कुणी

कष्टमय चाकरीत…!३

 

जात्यावरी घरघर

पीठ भाकरीचे येई

चुलीवर शेकताना

घरादारा अन्न देई…! ४

 

भाकरीच्या चंद्रासाठी

हात आईच जळालं

दारीद्रयाचं दुःख मोठं

दारी मागल्या पळालं..! ५

 

भाजी चटणीची जोड

कधी दुधातला काला

खरपूस भाकरीचा

असे हरी रखवाला….! ६

 

बाल तरूण वार्धक्य

होई वेळेला‌ हजर

औक्षवंत लेकरांची 

काढे भाकरी नजर…! ७

 

अशी भाकरी भाकरी

जेवणात रोज हवी

रूचकर स्वादातून

देई ताकद ती नवी..! ८

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments