श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 174 – हाक धरतीची ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
☆
हाक धरतीची
ऐक रे माणसा।
वन संवर्धन
हाती घेई वसा।
कूपनलिकांची
केलीस तू जाळी।
रेखा विनाशाची
कोरलीस भाळी।
विकासाकारणे
झोपले डोंगर ।
नदी नाले आणि
दुषीत सागर।
पर्यावरणाचा
थांबवावा ऱ्हास।
होऊ दे मोकळा
कोंडलेला श्वास।
सुगंधीत व्हावी
धरेची ओंजळ।
सुख समृद्धीचे
वाहू दे ओहळ।
घुमू देत कानी।
पाखरांची गाणी
पाचूच्या शालूत
खुलू दे धरणी।
धरतीची आस
हिरवा निसर्ग ।
देव चराचरी
नि धरेचा स्वर्ग ।
☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈