सौ. प्रतिभा संतोष पोरे 

? कवितेचा उत्सव ?

☆ माय भवानी… ☆ सौ. प्रतिभा संतोष पोरे ☆

✒️

आदिशक्ती प्रणवरूपिणी

संबळ वाजतो दारी गं

अर्पण करते पंचप्राण हे

देई ठाव मज चरणी गं । १।

✒️

सजली माझी माय भवानी

श्वेत वस्रे सुंदर सजली गं

त्रिशूळ, डमरू घेऊन हाती

शुभ्र नंदीवरी बसली गं ।२।

✒️

भाळी मळवट चंदनाचा

वरी कुंकूम लाली चढली गं

कवड्याची माळ  घालूनी

कंठी ठुशी,तन्मणी शोभली गं ।३।

✒️

अथांग सागर करूणेचा

वाहे सदा तव लोचनी गं

भावभक्तीने नमन करते

त्रैलोक्याची तू जननी गं ।४।

✒️

लिंग स्थापूनी तप करूनी

होसी शिवाची स्वामिनी गं

प्रसन्न होऊन वर दे शक्तीचा

शरण मी तुझिये चरणी गं ।५।

✒️

© सौ. प्रतिभा पोरे

पत्ता – ‘सोनतुकाई’, शांतीसागर कॉलनी, सांगली – भ्रमणध्वनी क्रमांक – ८७८८४५८६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments