सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ सृष्टी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
(षडाक्षरी)
☆
ढगाळ आभाळ ,
अवचित वेळी !
थंडीला वेढून ,
हवा पावसाळी!…..१
चाहूल थंडीची
सरे पावसाळा ,
अचानक वाजे,
पावसाचा वाळा……२
पाऊस न् थंडी,
निसर्ग सजला,
गारव्यात याच्या,
माणूस भिजला …..३
ऋतू चक्रामध्ये,
मनस्विनी सृष्टी!
दिसते सर्वांना,
तिची चमत्कृती!….४
नकळत सारी,
सृष्टी ही गोठली!
थंडी च्या ऋतूत,
‘स्ट्यॅच्यू’ हीच झाली!…५
☆
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈