डॉ.सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
☘️ तारांबळ ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
☆
तोल किती साधायचे,
मोल ज्याचे उरले नाही.
इतकी तारांबळ तरी
सोडता का सुटत नाही ?
☆
किती व्याकूळ जीव
दुषणे एकवत नाही
तरीही नजर वाटेची
सोडता सुटत नाही
☆
जिद्दीने चालतो जो
वादळांची बिशाद नाही
पावलांना उमेद आता
काळजातून पाझरत नाही
☆
साजिरे हे रुप केवढे !
गोरीऱ्या त्या पाकळ्या
वादळाला का न कळला,
तिच्या मनातील मोगरा
☆
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈