महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 156
☆ हे शब्द अंतरीचे… अंगणात माझ्या…! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/
☆
अंगणात माझ्या उभा तो प्राजक्त
सुगंध त्याचा दरवळे नित आसमंत १
☆
त्याचा प्रश्न सदैव एकच असतो
एकटाच का बरे तू नेहमी असतो २
☆
नाही कुणी तुला जीव लावणारे
तुझ्यावरी पंचप्राण ते ओवळणारे ३
☆
नाही का तुझ्या हृदयात कोणी
प्रेमळ हृदयाची जीवन-सांगिनी ४
☆
प्रेम कधीच नाहीका तुला कुणावर झाले
का कुणीच नाही तुझ्यावर कधी प्रेम केले ५
☆
हास्य करतो मी फक्त तेव्हा त्या क्षणाला
बोलूच काय मी या चित्तचोर प्राजक्ताला ६
☆
हृदयात वसते माझ्या अनामिक एक ती
जिच्या साठी जगतो मी दिन आणि राती ७
☆
तिचे प्रेम लाभेल मनीं आस आहे
तिचे सौख्य लाभेल मी अश्वस्थ आहे ८
☆
येईल कधीतरी ती आहे विश्वास माझा
आरे प्राजक्ता तू फक्त दे रे साथ माझा… ९
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈