कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 208 – विजय साहित्य ?

लतावेल ही ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

आठवणींची लतावेल ही,अंतरातले जीवन गाणे

नऊ दशकांचे नवरस ,स्वर सुरात रंगून जाणे…||धृ.||

*

एक सहस्र, गीते गायन, हिंदी संगीत विश्वात ठसा, 

गानकोकिळा,पार्श्वगायिका,सप्तसुरांचा संगीत वसा

वय तेराचे, उदया आली, स्वरयोगिनी, सूर दिवाणे…||१.||

*

शफी मौलवी, गुरू जाहले, उच्चार कलेची, श्वाससुता

आशा,उषा, मीना,स्वरशाखा, ह्रदयनाथ, भावंडलता

मोगरा फुलला, लतादीदी, अजरामर सुवर्ण नाणे…||२.||

*

शैली आगळी, शारद वाणी, गंधार स्वरयात्रा विरली

वसंत वैभव,गानलता, संगीत क्षेत्री ,ह्रदी ठसली

कल्पवृक्ष कन्येसाठी बाबा,दिनानाथ हे श्वास तराणे..||३.||

*

बोल गीतांचे,अभिजात ते, भारतीयांचा स्वर सन्मान

मंगळा गौर,गीत पहिले, वर्षाव स्वरांचा ,कंठस्नान

मनात माझ्या,पिढ्या पिढ्यांचे,रत्न भारताचे,दैवी गाणे..||४.||

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
2 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments