श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? कवितेचा उत्सव ?

☆ चौदा फेब्रुवारी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

उरात व्हावी धडधड माझ्या, असेच काही घडले

गुलाब देता त्याने हाती, मी माझी ना उरले

*

तारीख चौदा फेब्रुवारी, अन वेड्यांची जत्रा

फूल घेउनी समोर कोणी, कोणी मागे दडले

*

एकविसाव्या शतकामधली, म्हणते स्वतःस मी तर

प्रेमासाठी धर्मांतरही, होते करून बसले

*

रंग बदलणे सुरू जाहले हळूहळू सरड्याचे

हिरवा पाला त्याला प्यारा, मी पाचोळा ठरले

*

माय-पित्याच्या बागेमधली, कळी कोवळी होते

बहर फुलांचा सरण्या आधी, कर्माने मी सुकले

*

भाळावरती सौभाग्याचे, कुंकू नव्हते माझ्या

नवरा असता भाळ पांढरे, घेउन मीही फिरले

*

काय करू मी या देहाचे, उरली नव्हती ऊर्जा

शरीर होते जिवंत माझे, मन फासावर चढले

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments