श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ गुलजार… ☆ श्रीशैल चौगुले ☆
‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त गुलजार यांना.💐💐
☆
माझे घर रावीपार
अजून एखादी तार
अधीरुन वारंवार
माणूसकीचा शिवार.
*
तुटले तेंव्हा जिव्हाळे
मनात दुःख वेदना
भिंतींना जातोच तडा
कर्माची एक साधना.
*
काय घडले घडावे
लेखणी हाती फिरते
सहज शब्दांची किमया
शब्दात काव्य तरते.
*
फुलांचे बन शब्दभार
मी नावाचा गुलजार
भारतमातेचा स्वीकार
जन्मोजन्मी उपकार.
*
या ज्ञानपिठाचे हे रत्न
रावीपार स्मृतींचा बिंदू
मी लिहीतच जातो प्रेम
भक्ती हिंदवी ज्ञानसिंधू.
*
किती मित्र जिवाशी भिड
कुणी वीर,हुतात्मा थोर
काव्यांने दिला मज धीर
शब्द-शब्द स्वातंत्र्याचा शेर.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈