सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ तू 🧚… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
☆
शब्दाशी तू नित खेळत राहावे
अन फुलून यावी तुझी कविता
चांदणगात्री बहरून यावे अन
स्पर्शात लाभो एकजीवता
*
अमृतमय त्या ओंजळी तुनी
मधुघटांनी रिक्तची व्हावे
करपाशी मम चांदण गोंदण
तुझे नित्यची लखलखत ऱ्हावे
*
स्पर्शसुखाने जाग यावी
दिवसाही मग रातराणीला
गंधाळून मम अंगांगाला
सूर गवसावा रागिणीला
☆
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈