प्रेमकवी दयानंद
परिचय
श्री.दयानंद लक्ष्मण घोटकर
शिक्षण एम्.ए.बी.एड्.
- गायक,संगीतकार, लेखक, कवी, बालसाहित्यिक
- सांस्कृतिक क्षेत्रात ४२ वर्षे कार्यरत
- झलक, निषाद या संस्थांसाठी सुमारे २५०० सांस्कृतिक कार्यक्रम सादर
- पुणे फेस्टिवल साठी ‘पुणे नवरात्री महोत्सवात सहभाग
- दूरदर्शन, आकाशवाणी साठी मालिका,संगितिका, गीतरामायण, बालोद्यान इ.सहभाग व सादरीकरण.
- मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन
- शिक्षकांसाठी बालचित्रवाणीतील कार्यक्रमास राष्ट्रीय पुरस्कार
- बालसाहित्य , सीडी,कॅसेट प्रकाशित
- अ.भा.साहित्य संमेलन, आळंदी येथे सहभाग
- अंगणवाडी,बालवाडी ,शिक्षक प्रौढसक्षरता विभागासाठी शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती
विविध सन्मान : पणे महानगरपालिका,नॅशनल मुव्हमेंट आर्ट,अ.भा.जैन संघटना,कुलफौंडेशन, रोटरी क्लब, अ.भा.नाट्यपरिषद पुणे कलांगण मुंबई अशा अनेक संस्थांकडून सन्मान व पुरस्कार प्राप्त.
सभासद : अभिनव कला भारतीय संघटना,अ.भा.नाट्यपरिषद परिषद,हरि किर्तनोत्तेजक संस्था, गानवर्धन आदी नामांकित संस्थांचे सदस्य आहेत.
कवितेचा उत्सव
☆ जगी सर्व सुखी ☆ प्रेमकवी दयानंद ☆
☆
जगी सर्व सुखी
असा मीच आहे
एक कल्पवृक्ष कवितेचा
माझ्या मनात आहे…
किती अद्भुत सुगंधी
पाने, फुले विविधरंगी
वेचण्यात, गुंफिण्यात एक धुंदी..
कधी आनंद, कधी दुःख
कधी स्वप्न, कधी सत्य
कधी प्रीती, कधी विरह
सा-यांचे स्वागत अगत्य…
विविध रस, रुप, स्पर्श,गंध
अन् लय, ताल, वृत्त, छंद
चारोळी, शायरी, काव्य
सा-यात होतो धुंद…
हसतो, रडतो, खेळतो
मौनातुनी कधी बोलतो
मी लिहूनी होतो, शुद्ध, स्वच्छ
शब्द, सुरांच्या जगात रमतो…
☆
© प्रेमकवी दयानंद
संपर्क – तावरे काॅलनी.सातारा रोड.पुणे
मो 9822207068
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈