☆ कवितेचा उत्सव ☆ शाईचा रंग ☆ श्रीओंकार कुलकर्णी ☆
शाईचा रंग कोणता?
कोण आहे जाणता?
कुणी कापले किती
अन कुणी मारले किती
कोणास काय भीती
शाईचा रंग कोणता
कोण आहे जाणता?
भोगत्या झाल्या माद्या
अन बाल्य पोरके झाले
घास झाला सांडता
शाईचा रंग कोणता
कोण आहे जाणता?
झाले तह किती ते
अन फौजा सरल्या किती त्या
ईतिहास चक्र चालते
शाईचा रंग कोणता
कोण आहे जाणता?
© श्री ओंकार कुलकर्णी
20-12-2018
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈