श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 232 ?

दोन्ही किल्ले ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

नारी मुक्ती नारी मुक्ती गर्जत होते

मुक्त मनाने वावरले की बडवत होते

*

का काट्यांनी फुलाभोवती केले कुंपण

कळीस तर ते डोक्यावरती चढवत होते

*

स्त्री जातीच्या वाटा विस्तृत केल्या ज्यांनी

त्या वाटेवर महिलांना मी वळवत होते

*

जगापुढे या सावित्रीच्या लेकी याव्या

म्हणून नारी शक्तीला मी घडवत होते

*

शुभ्र पांढरी लोकर वाटे ती डोळ्यांना

शीत कड्यांचे समोर मोठे पर्वत होते

*

वाऱ्यासोबत धावत सुटलो आम्ही साऱ्या

ते हाताने सुगंध आता अडवत होते

*

बेड्या हाती पडल्यावरही कुठे थांबले

घर व नोकरी दोन्ही किल्ले लढवत होते

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments