डाॅ. विष्णू वासमकर
कवितेचा उत्सव
☆ मत माझे हक्काचे! ☆ डाॅ. विष्णू वासमकर☆
☆
आपणा सर्वांच्या कल्याणास्तव
मतोत्सव लोकशाहीचा,
मतदानाचा दिवस नव्हे
सुट्टीचा अन् मौजेचा ! १
राजकारण आमचे नव्हे
ते आहे गुंडांचे,
गरीब काय करील सांगा
धनदांडग्या पुंडांचे ! २
असे म्हणत राहिलो तर
वाईट माणसेच नेते होतील,
मत न देता बसलो तर
स्वार्थी कोल्हे सोकावतील ! ३
कुणीही येवो निवडून
मला काय करायचे,
मत माझे वाया जाईल
असे नाही बोलायचे ! ४
उडदामाजी काळी गोरे
सर्वत्रच भेटायचे,
त्यातील योग्य-अयोग्य
आपणच असते ठरवायचे ! ५
मत माझे हक्काचे
त्याचा वापर करणार,
योग्य नेत्यास निवडून देऊन
कर्तव्य माझे पार पाडणार ! ६
देशाचा जे विचार करतील
त्यांनाच निवडून देऊया,
देशापेक्षा जे मोठे असतील
त्यांना बाजूस बसवुया ! ७
मत माझे मोलाचे
वाया नाही जाणार,
देशाचा विचार करणारा
नेताच नायक बनणार !! ८
☆
© डाॅ. विष्णू वासमकर
स्थळ : हिमालय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈