सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ विसावा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
☆
असा विसावा मनास मिळावा,
भान न रहावे काळाचे !
शांत मनाने उजळत रहावे,
दिवे अंतरी आठवांचे!….१
*
सुरम्य संध्या साथ असावी,
नभी तोरणे किरणांची!
तांबुस पिवळ्या रंगाची,
उधळण व्हावी गंध फुलांची! ….२
*
नजरेमध्ये जरा फुलावा,
रंग पिवळा बहाव्याचा!
जांभुळ केशरी गुलमोहर ही,
दाखवी रंग बहारीचा!….३
*
निसर्ग करतो किमया सारी,
न्याहाळीतो मी असा खुळा!
क्षण विसाव्या चा मनी खेळतो,
फुलवित माझा स्वप्न झुला!….४
☆
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈