श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ आता तरी सावरा रे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
मी किती अस्वस्थ आहे शांतविण्या येऊ नका
दाह आहे अंतरीचा लेप वरचे लावू नका.
*
निसटले जे यश तयाला निश्चये मिळवेन मी
दूर माझा गाव गेला तरी तो पुन्हा गाठेन मी
*
शब्द साधे बोलतो तरी का बरे ते बोचती
फूल वेचायास गेलो काटेच सारे टोचती
*
कष्टणारा कष्टतो अन् पाहती सारे मजा
मूर्ख सुखी लोळतो अन् शाहणा भोगी सजा
*
थांबवा हे खेळ फसवे लाज थोडी बाळगा रे
तोल ढळत्या या भूमीला, आता तरी सावरा रे
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अप्रतिम रचना