श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 239 ?

सतार हृदयी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

छोटेखानी कपाट हृदयी

इथे मांडशी किती पसारा

घर शिस्तीचे माझे सासर

थंड ऋतुतही चढतो पारा

*

तो अश्रूचा आहे ओघळ

आरशास का कळते केवळ ?

जगा वाटते श्रावण धारा

इथे मांडशी किती पसारा

*

ऋतू कोवळे इथे फुलांचे

फूल पाखरा बागडण्याचे

माझ्यासाठी का ही कारा ?

इथे मांडशी किती पसारा

*

संसाराचे स्वप्न पाहिले

सुरात होते गीत गायिले

सतार हृदयी तुटल्या तारा

इथे मांडशी किती पसारा

*

दिसले कोठे गलबत नाही

नुसते पाणी दिशास दाही

मला रोखतो रोज किनारा

इथे मांडशी किती पसारा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments