सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  कवितेचा उत्सव  ?

☆ सत्य… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

दुःखालाही कंटाळा आला,

वास्तव्याला राहण्याचा !

सतत प्रश्न अन् कटु सत्याला,

संगत घेऊन जगण्याचा !…..१

*

कोण तू  अन् कोण मी,

आपण सारे भाग सृष्टीचे

उत्पत्ती अन् लय यांचे,

साक्षी निसर्ग किमयेचे !….२

*

कुठे, कसे, कधी जन्मा यावे,

हे तर आपल्या हाती नाही

लक्ष योनीतून फिरता फिरता,

जगी काळ घालवतो काही !…३

*

धागे सारे मोह मायेचे ,

उगीच बांधतो स्वतःभोवती

मोहवणाऱ्या जगी  जिवाला,

गुंफून घेतो अवतीभवती !….४

*

सत्य चिरंतन मना  उमगते,

जेव्हा येते कधी आपदा

निमित्त मात्र ही असतो आपण,

भू वरी या सदा सर्वदा !…५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments