सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ माझा आधार -वड ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सोडून गेला तुम्ही अकाली,

या जन्मीची गाठच सुटली !

राहिले मी इथेच आता,

तुझ्या विना का जगी एकली!….१

*

बांधू न शकले तुझं हाताला,

कमी पडला सावित्रीचा धागा !

मजवरी पडला अवचित घाला, 

तुम्हांस  मिळाली स्वर्गी जागा !…२

*

सावित्री होती पुण्यवान मोठी,

तप केले तिने भ्रतारासाठी !

यमास केले प्रसन्न तिने,

ओढून आणी सौभाग्य हाती!….३

*

इतकी पुण्याई नव्हती माझी,

तुझ्या सवे जाण्याची वरती !

तरीही पूजिते वटवृक्षाला,

पुढील जन्मी दे हाच साथी!…४

*

होतास तू माझा आधारवड !

आदर, भक्ती, प्रीती तुजवर !

जिरवते मी मनातले कढ,

 दुःखी होई जरी माझे अंतर !…५

*

मन होते जरी अस्वस्थ माझे,

घडणारे ते घडून जाते !

सांत्वन करते मीच मनाचे,

 रामाची इच्छा म्हणून राहते !….६

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments