श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ हवा पावसाळी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
हवा पावसाळी
अशा सांजवेळी
बेधुंद वा-यापरी होऊनिया
नव्या पावसाचे नवे गीत गावे
नव्या पावलांनी
नवे मेघ आले
जुन्या आठवांनी
मना चुंबिले
मनाच्या घनाचे
फुटावेत बांध
तुटावे मनाचे
आता सर्व बंध
हवा पावसाळी
अशा सांजवेळी…….
हवा पावसाळी
अशा सांजवेळी…
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈