श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ आळंदीचा छंद... ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
अजब पालखी / ज्ञानेशाची दिंडी
वारकरी झुंडी / विठ्ठल पेले //
*
भक्ताची काळजी /आळंदीचा राजा/
सांभाळतो प्रजा /ग्रंथमाऊली//
*
जन्माचा सोहळा /भेटीसाठी आस/
अभंगाचे दास/लहानथोर //
*
ऐटीत पंढरी /पांडुरंगी वास /
चंद्रभागा खास/स्वर्गभुवरी //
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈