सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ करू तेज-पूजा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
दीप अवसेस पूजलेले दीप पाहून
मेणबत्तीदाणी बसली पहा रुसून॥
*
आसन आपले झालेले उदास पाहून
धागा जळे मेणबत्तीचा,गेले मेणाश्रू वाहून॥
*
सिंहासनास आली दया, गेले कानी सांगून
विझताना वात जा दूसरी लावून ॥
*
लावलेली दुसरी ज्योत, राहील मशाल होऊन
प्रज्वलीत तेज जाईल पुढे घेऊन ॥
*
माणूसही गेला म्हणजे, दिवा एक तेवतो
एका जन्मातूनी जाता जीव दुसरा घेतो ॥
*
तेज जन्मे तेजातून, नियम नियतीचा असा
तेज पूजा करण्याचा, दीप अवसेस वसा॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈