श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “माझी कविता…” ☆ श्री आशिष मुळे ☆

माझी कविता म्हणजे

मला जड झालेली मुलगी नाही

आयुष्यभर हृदयाशी सांभाळाया

मला तर काहीच हरकत नाही

*

हवीहवीशी नसेल जरी ती इतरांसी

तिच्याविन मला दुसरी सोबत नाही

बाजारात जरी जागा नसली

हृदयीच्या देव्हाऱ्यात जागेची कमी नाही

*

पुसती मला प्रसिद्धी किती

मागती हुंडा याची जाण नाही

जरी बाप गरीब मी कवितेचा

तिच्या आईची ह्यांना कल्पना नाही

*

ठीक आहे होणार नाही बेस्ट सेलर

तरी ती माझी आहे दुसऱ्याची नाही

माझ्यासाठी ती माझी मोक्ष-लक्ष्मी

प्रकाशकांच्या ती नशिबी नाही

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments