मेहबूब जमादार
कवितेचा उत्सव
☆ जात… ☆ मेहबूब जमादार ☆
☆
पावसाला जात नाही म्हणूनच तो पडतो आहे
जातीसाठी घालून गोंधळ माणूस रडतो आहे
*
संप मोर्चे आणि उपोषण जातीसाठी चालू आहे
नाही जात निसर्गाला म्हणून तो बहरतो आहे
*
प्रसंगी खून सांडते, वाढते शत्रुत्व जातीसाठी
माणसाला का कळेना?आपण काय करतो आहे
*
क्षणभंगुर आपले जीवन , केंव्हाही येथून जाणे
कळून ही सारे तो का ?संपत्तीने घर भरतो आहे
*
बांधूनी बंगले चार ठिकाणी राहतो एक ठिकाणी
येणे नाही काहीच सवे, तरी का राबतो आहे?
*
जगा माणसासाठी आणि माणसासारखे रहा
देव तुझ्यातच असता तो का जगी फिरतो आहे
☆
© मेहबूब जमादार
मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈