श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 253
☆ वेदनांची दालने ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
वेदनांची दालने भरली किती
मोकळी जागा इथे उरली किती
*
पुण्य पापाला असे मोजू नका
या सुखासाठी रया झुरली किती
*
ठेवले होते ठसे वाळूवरी
लाट येता ही स्मृती विरली किती
*
मूठ उघडी ठेवुनी गेलेत ते
दैलतीची थोरवी जिरली किती
*
चांगल्या वस्तीत जागा शोधण्या
रोज रस्त्यावर व्यथा फिरली किती
*
पूर्व भागी रोज भोंगे वाढती
माणसे देशात ही शिरली किती
*
डोंगरांने प्रेम त्याला लावले
कातळाने ओल ही धरली किती
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈