सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ || गणेश प्रार्थना || ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

हस्त वदन तू लंबोदर 

वंदन तुला सर्वागोदर 

हस्त तुझ्या कृपेचा राहूदे 

अखंड माझ्या या डोईवर ||

*

हे विघ्नहर्त्या, विश्व नायका 

विनंती माझी ऐका बरका 

हे विश्व शांती सौख्याने नांदो 

वर मिळावा वर दायका ||

*

कर जोडूनी तुला सांगते 

सक्षम नारी व्हावी वाटते 

कर आता तूच जादू काही 

अभयदान तुला मागते ||

*

पद तुझे रे मी ना सोडीन 

श्वासासवे तुलाच स्मरेन 

पद तुझ्या या ध्येयासक्तीचे 

अविरत ओठी आळवीन ||

*

जपा उरी गणेश सर्वदा 

स्मरणाने सरती आपदा 

जपा कुसूम दुर्वा वाहून 

मिळविते निखळ प्रमोदा ||

*

अभंग, गाणी, ओवी लिखाणा 

स्फूर्ती द्यावीस विद्या दायका 

अभंग राहील स्रोत स्तुतीचा 

वचन तुला भव तारका ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments