सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “कोण मी ?” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
☆
कोण मी काय आहे
माझे मलाच कळू दे
प्रत्येक नावाआधी
जाणून स्वतः ला थोडे घे…
*
जग हे सुंदर, जीवन सुंदर
नात्यांमुळेच अर्थ जगण्याला
प्रत्येक नात्यात सिद्ध करताना
का होई जीव मग अर्धा अर्धा…..
*
लेक, पत्नी, सून, आई
बहिण, भावजय, मैत्रीण
कोणासाठी कोणीतरी तू झाली
स्वतः ला मात्र विसरून गेली….
*
सगळ्यांची आवडती होता होता
सतत बदलत तू गेली
खरी तुझी तुला सांगा आता
ओळख काय मागे उरली…. ?
*
सतत होताना परफेक्ट
झाला तुझ्यावरच इफेक्ट
करता करता सारं एक्सेप्ट
स्वतःला मात्र करत गेलीस रिजेक्ट…
*
नातं स्वतः शी असतं पहीलं
त्याला तोडून चालत नसतं
रोजच्या घाई गडबडीतही
स्वतः साठी काही क्षण जगायचं असतं…
*
रहा नक्कीच जगासोबत
जगून घे प्रत्येक नात्यासोबत
पण साथ स्वतःची सोडू नको
हरवून स्वतःलाच जगू तू नको…
*
जगात कुठेच मिळणार नाही
सुख समाधान शांती
तुझ्यातच आहे दडलेलं सारंकाही
त्यासाठीच बघ जोडून नातं स्वतःशी…
☆
💞शब्दकळी विजया 💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈