श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ पुन्हा-पुन्हा स्वप्न.. ! ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
हिरव्या तलवारीवर
सोनेरी रुदनाचे ज्योती
वार किरणांचा भारी
धारदार डोलती पाती
*
सप्तरंगी नभात युध्द
क्षितीजा हरवणे जिद्द
उन पावसाचा हा खेळ
झर्या-नाल्यांची पार हद्द
*
खळखळ मंजुळ साद
प्रेमगप्पा पाखर पंखा
फडफड भिजरे अंग
टपटप धारांचा डंका
*
श्रावण चाहुल काळजा
चोहिकडेही गजबजा
सारे रान, माळ हसरे
दुर डोंगरी ऋतू साजा.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर