प्रा. भरत खैरकर
कवितेचा उत्सव
☆ “निर्माल्य…” ☆ प्रा. भरत खैरकर ☆
☆
घोषणांनी गाभण
इथला आसमंत
असत्याचे पीक
फोफावले
निर्मम शांतता
जागी अचानक
घोषणांचा नाद
दुदुंभला
ज्याला त्याला हवे
फुकटाचे सारे
घोषणांचे वारे
गल्लोगल्ली
मनोमनी राग
भंगला समाज
द्वेषाचीच आग
दारोदारी
विश्वासाचे फुल
निर्माल्य बनले
कोमेजले मन
रामाठायी……..
☆
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈