श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 257 ?

☆ घ्यावी दीक्षा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

हिमालयाची वाट धरुनी मला वाटते घ्यावी दीक्षा

संसाराचा मोह त्यागुनी मला वाटते घ्यावी दीक्षा

 *

कुतरओढ ही झाली आहे आयुष्याची कायम माझ्या

दैना सारी दूर सारुनी मला वाटते घ्यावी दीक्षा

 *

पैशासाठी खून दरोडे मारामारी चाले येथे

लोभ भावना ठार मारुनी मला वाटते घ्यावी दीक्षा

 *

महंत आता कुणीच नाही समोर माझ्या काय करावे

ईश्वर साक्षी फक्त ठेवुनी मला वाटते घ्यावी दीक्षा

 *

कशास लपवू जगापासुनी मनातले मी माझ्या आता

जगात साऱ्या सत्य सांगुनी मला वाटते घ्यावी दीक्षा

 *

प्रेमापोटी मला थांबवू पहात होते सखे सोयरे

त्या साऱ्यांचा ऋणी राहुनी मला वाटते घ्यावी दीक्षा

 *

ब्रह्मानंदी टाळी आता लागत नाही त्याच्यासाठी

आत्म्यालाही जागे करुनी मला वाटते घ्यावी दीक्षा

 

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments