☆ कवितेचा उत्सव ☆ टर्निंग पॉईंट जीवनाचा ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆
धक्का देणारा, विषन्न करणारा ।
सहज होत्याचे नव्हते करणारा ।
सुंद नि सर्व अस्थिर करणारा ।
चालते बोलते प्रेत बनवणारा ।
कळायचे,वळायचे बंद करणारा ।
भयाण काळ ,जणू फणा नागाचा ।
टर्निंग पॉईंट जीवनाचा ।।1।।
सर्वांच्या आयुष्यात उद्भवणारा ।
त्रासिक नि चिंताग्रस्त बनवणारा ।
निर्णयक्षमता शून्य करणारा ।
सुरळीत जीवनात वादळ उठवणारा ।
भविष्याचे प्रश्नचिन्ह दाखवणारा ।
दरी म्हणावी की डोंगर अडथळ्यांचा?
टर्निंग पॉईंट जीवनाचा ।।2।।
पण,हाच टर्निंग पॉईंट जीवनाचा ।
घेता क्षणाचा निर्णय सकारात्मकतेचा ।
कधी ठरतो मिरॅकल जीवनाचा ।
रस्ता अडथळ्यांचा आव्हानांचा ।
‘पण’ लागतो चिकाटीचा, स्पर्धा हेलकाव्यांशी ।
युद्ध करावे आपणच, सहज न सरणाऱ्या या दिसांशी ।
विविध धड्यातून सुंदर मिळेल मार्ग,
करता मैत्री टर्निंग पॉइंटशी ।
© सौ अश्विनी कुलकर्णी
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈