प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ जीवन यज्ञ… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रतिभेच्या स्पर्शाने या माणूस सुज्ञ होतो

सुज्ञ होताच माणूस यज्ञ जीवनाचा होतो..

सुविचार समिधा समिधा ह्या विवेकाच्या

विवेकाच्या संपर्कात यज्ञ सफल हा होतो..

*

मन स्थिरावते जागी बनू पाहते ते योगी

दिसू लागे “तो” सामोरी देह कामक्रोध त्यागी

त्यागातच लाभे सुख सुख परमानंदच

ब्रह्मानंदी लागे टाळी आनंदच देहा लागी…

*

भवसागर सुटता माया मोह तो आटता

पैलतीरी उभा दिसे जगताचा तो नियंता

डोळे निवती पाहून मन विलिनच होई

विलयात समाधान वाटते रे भगवंता…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments