श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
☆ 🪔 शु भ दी पा व ली ! 🪔 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
रंग सारे रांगोळीतले
उधळा आपल्या जीवनी,
जमतील तसे ज्ञानदीप
लावा लोकांच्या मनी !
*
उजळून टाका दीपावली
असेल कोणाची अंधारी,
मदत करा त्या मुक्तहस्ते
मारु दे त्या गरुड भरारी !
*
आकाश कंदील स्वप्नांचे
खुशाल उडवा बेलगाम,
सत्यात आणण्या त्यांना
गाळा मेहनतीचा घाम !
फराळ गोड आठवणींचा
*
ठेवा कायम तुम्ही मनात,
येता अनुभव कटू कधी
विसरून जा तो क्षणात !
*
सदा ठेवा आठवण तुम्ही
त्या शूर वीर जवानांची,
त्यांच्यामुळे होई आपली
दिवाळी खरी सुखाची !
… दिवाळी खरी सुखाची !
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈