☆ कवितेचा उत्सव : लपलास का रे देवा…. ☆ श्री गौतम कांबळे ☆
वाचवेल कोण आता सांग तुझ्या लेकराला
लपलास का रे देवा गाभाऱ्यात आडोशाला
माझी काया रे नाजूक तुझे अंग दगडाचे
कसे कळणार दु:ख तुला जंतू प्रतापाचे
कधी फुटेल पाझर तुझ्या दगडी मनाला
लपलास का रे देवा गाभाऱ्यात आडोशाला
कष्टातला माझ्या घास वाहिला मी तुझ्या पायी
कर्मकांडे तुझी मी रे कधी चुकवली नाही
दुग्ध अभिषेक तुला भुके ठेवून बाळाला
लपलास का रे देवा गाभाऱ्यात आडोशाला
कसा ठेवू भरवसा सांग तुझ्या आस्तित्वाचा
ठेवा येईल कामाला माणसाच्या कर्तृत्वाचा
सारे शांत झाल्यावर धावशील तू श्रेयाला
लपलास का रे देवा गाभाऱ्यात आडोशाला
© श्री गौतम कांबळे
सांगली
मो – ९४२१२२२८३४
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
आपल्या साहित्य चे स्वागत आहे.
बेहतरीन रचना बधाई