सौ. मुक्ता महेश अभ्यंकर
☆ कवितेचा उत्सव ☆ कधी वाटे मला… ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆
कधी वाटे मला………..
कधी वाटे मला गाणे होऊन जगावे
सुरांच्या धबधब्यात निरंतर न्हावे
कधी वाटे मला फुल होऊन जगावे
वारा नेइल तिथपर्यंत सुगंधरूपी दर्वळावे
कधी वाटे मला वारा होऊन जगावे
निसर्गातील हिरवेपण शोधीत निरंतर वहावे
कधी वाटे मला वारा होऊन जगावे
निसर्गातील हिरवेपण शोधीत निरंतर वहावे
कधी वाटे मला खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगावे
दिव्यत्वाची प्रचिती येताच कर माझे जुळावे.
© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर
संपर्क –साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुंदर