श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “ती…” ☆ श्री आशिष मुळे ☆

कोण आहे ‘ती’ कोणी सांगू शकेल का 

दिसूनी अदृष्य ‘ती’ कोणी पाहू शकेल का 

आहेत सर्वश्रुत जागा ‘तिच्या’

‘तिच्या’ पर्यंत कोणी पोहचू शकेल का ||

*
खेळवी कधी राज-प्यादी

रस्त्यात उभी नजर-पारधी

पिवळ्या एका धातूसाठी 

बनवी सर्वजनास गारदी ||

*
हिच्यात ‘ती’ नेहमीच वसती

केश साधे पाश भासती 

नाजूक त्या ओठांमधुनी 

नि:शब्द-बाण जिव्हारी लागती ||

*
हिच्या आतही तुझ्यासारखेच रक्त 

हिचे मनही तुझ्यासारखेच व्यक्त 

फक्त हिला साथ ‘ तिची ‘

म्हणुनी हिला चंदनाची किंमत ||

*

प्रकृतीही ‘तिलाच’ म्हणती 

हिची प्रकृतीही ‘तीच’ असती 

मंदिरातूनही त्या अव्यक्ताच्या 

सत्ता फक्त ‘तिची’ चालती ||

*
‘तीच ‘ माया अन तिचीच ‘माया‘… 

*

पैशात माया प्रेमात माया 

मायेत माया कायेत माया 

भक्तीत माया व्यक्तीत माया 

देवात माया देवळात माया ||

*

‘ तीच ‘ माया अन तिचीच ‘ माया ‘

*
हिच्या जाळ्यात माया 

तिच्या काळ्यात माया 

हिच्या असण्यात माया 

तिच्या नसण्यात माया ||

*
‘तीच‘ माया अन तिचीच ‘माया‘

*
ह्याच्या दृष्टीत साया

हिच्या शब्दात माया 

ह्याच्या हृदयात काया 

हिच्या कायेत माया…||

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments