श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्दसुख… ☆ श्रीशैल चौगुले ☆

काही व्रण पुसतच नसतात

खोल-खोल अंतरित ठसलेले

काही लाटा प्रवाहत असतात

कातरल्या किनार्यात घुसलेले.

*

काही क्षण आठवण असतात

हृदयात जन्मभरी. जपलेले

काही दुःख सलतच असतात

नियतीच्या बाणापरी खुपलेले.

*

स्पर्श, थेंब मनातून ओथंबून

काही ऋतू वेदना थोपवतात

कस्तुरीमृग भाव शोधताना

बहर, जख्मांना लपवतात.

*

धुंद-मंद स्पंदनातला भ्रमर

शब्द छंद मकरंद मुग्धपान

नव चंद्र प्रहरी जणू बांधणी

वृत्त बंधनात नृत्य काव्यगान.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments