श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ समय समई… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
विश्वाच्या मदिरी धरेची ओंजळ
समई प्रांजळ जळाच्या वातीत.
*
तेवते सतत गगन गाभारी
तिमीर संहारी चक्र प्रभा-संध्या.
*
किरण चैतन्य सृष्टीच्या प्रासादी
संजीव प्रसादी सर्व भूतमात्रा.
*
मायेचा ऊदय क्षितीजी हृदय
नितची अभय सेवा चराचरी.
*
प्रथम नमन सुखाचे गमन
स्वागता भुधन कृपा अविनाशी.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈