☆ कवितेचा उत्सव ☆ क्षण ☆ श्री आनंदहरी ☆
क्षण जे गेले क्षणी काळाच्या
क्षणांचा त्याच का मोह असावा?
विस्मरणाचे वरदान लाभले
स्मरणी का मग क्षण तो वसावा?
मोहविती रंग जरी प्राचीचे मना
सांजरंगी ना ती उधळण आहे
बहरता जीवनी सांजसावल्या
उगा मनी का घुसळण राहे
जाणे येणे नित अविरत चाले
क्षणा-क्षणाचे त्या आगळे देणे
जाताना का नच मन निर्मोही?
आठवण गाते जीवन गाणे
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈