श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 265 ?

फुलाला हेरले होते ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

कवीला हसताना मी एकदा पाहिले तेव्हा

सुरेली चाल लावुनी गीत मी गायिले तेव्हा

 *

तयाला गुढ शब्दांची थोरली जाण होती हो

सुरांच्या मुक्त साथीने मारली तान होती हो

सुमनांसारख्या ओळी शब्द मी ताणिले तेव्हा

 *

गुलाबालाही काट्यांनी पहा ना घेरले होते

सोडुनी गुण काट्यांचे फुलाला हेरले होते

मित्रता पाहुनी त्यांची सुखाला जाणिले तेव्हा

 *

हवा ही काय प्यालेली नशा ही काय केलेली

हवेलाही कळेना ती कशाने धुंद झालेली

फुलाच्या गंधकोशाचे अंश मी दाविले तेव्हा

 

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments