श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ आभाळाचे काळिज ज्यांचे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

आभाळाचे काळिज ज्यांचे, दुःखहि त्यांचे आभाळागत

हास्य जयांचे बुद्धागत ते, कधि ओघळती सुळि चढल्यागत

*

असिधारेवर अवघे जीवन, पदोपदी अन् अग्निपरीक्षा

देवदूत ते देवपणाची, अखंड देती सत्त्वपरीक्षा

*

प्रेषित होउन आले येथे, हाच तयांचा मुळी गुन्हा हो

सजा भोगण्या वनवासाची, राम जन्मतो पुनः पुन्हा हो

*

थोर महात्मे युगानूयुगे, प्राशत आले प्याले जहरी

तप्तलाल अन् तीक्ष्ण कट्यारी, द्रष्ट्यांच्याही घुसल्या नेत्री

*

युगपुरुषांच्या विटंबनेची, जन्मोजन्मी हीच कहाणी

साक्षीला ती कठोर नियती, खेद खंत ना डोळां पाणी!

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments